Supriya Sule Pune Welcome : जेसीबीतून फुलांची उधळण; बारामती जिंकल्यावर ताईंचं पुण्यात जंगी स्वागत
पुण्यामध्ये सुप्रिया सुळेंचं जंगी स्वागत, कार्यकर्त्यांकडून जेसीबीमधून फुलांची उधळण.
Baramati Lok Sabha Election Result 2024 : महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठेची लढाई ही बारामती लोकसभा मतदारसंघात झाली आहे. कारण गेली अनेक वर्षे राज्याच्या राजकारणात रुजलेल्या पवार कुटुंबातील दोन व्यक्ती निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) रिंगणात उतरल्या आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (Sharad pawar, NCP)पक्षाकडून सुप्रिया सुळे (Supriya Sule) तर अजित पवार (Ajit PAwar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar)मैदानात उतरल्या आहेत. नणंद-भावजयच्या लढतीकडे राज्याचं लक्ष लागलेय. बहुतांश सामान्य बारामतीकर शरद पवार साहेबांसोबत इमोशनली कनेक्टेड आहे तर दुसरीकडे अजित पवारांनी बारामतीचा कायापालट केला आहे . प्रचारासाठी दोघांनी जोर लावला होता. सुप्रिया सुळेंनी 16 व्या फेरी अखेर मोठी मुंसडी मारली आहे. सुप्रिया सुळेंना 1 लाख आठ हजार 490 चा लीड मिळाला आहे.