Pune Sunflowers | पुण्यात पिवळ्याजर्द सूर्यफुलांनी एअरपोर्ट रोडचं रुप पालटलं, निसर्ग सौंदर्याचा आविष्कार

Continues below advertisement

पावसाळ्यात सगळीकडे हिरवळ असताना पुण्याच्या एअरपोर्ट रोडवर मात्र पिवळीजर्द  सुर्यफुलं येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. पुण्यात खराडीहून एअरपोर्टकडे जाणाऱ्या रस्त्याच्या डिव्हायडरवर सुर्यफुलांची लागवड करण्यात आली आहे. रस्त्याच्या दीड किलोमीटर लांब अंतरावर असणारी ही फुलं नजरेला सुखावून जातात. हे दृश्य पाहण्यासाठी नागरिक या ठिकाणी वाट वाकडी करुन पुन्हा पुन्हा येताना दिसत आहेत. येरवड्यातील एका सामाजिक कार्यकर्त्याने पुढाकार घेऊन या सूर्य फुलांची लागवड केलीय आणि त्याला खतपाणी घालून ही सूर्यफुलं वाढवली. जेव्हा ही सूर्यफुलं काढणीला येतात तेव्हा त्यांचा वापर जवळच असणाऱ्या डॉ. सलीम अली पक्षी उद्यानातल्या पक्ष्यांसाठी खाद्य म्हणून केला जाणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram