Pune : राज्य मागासवर्ग आयोगाची पुण्यात बैठक, मराठा समाज मागास आहे का? बैठकीत चाचपणी करणार
राज्य मागासवर्ग आयोगाची आज पुण्यात बैठक होणार आहे. मराठा समाज मागास आहे का? याची या बैठकीत चाचपणी करण्यात येणार आहे. बैठकीला अध्यक्षांसह १० सदस्य उपस्थित राहणार आहे. बैठकीत विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गास वाढीव आरक्षण देण्याबाबत चर्चा केली जाणार आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या क्युरेटिव्ह पिटीशनला सहाय्य्क ठरेल अशी कोणती माहिती राज्य मागासवर्गीय आयोगाकडून मिळू शकते का याची चाचपणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार या बैठकीचं आयोजन करण्यात आलं.