Backward Class Commission : OBC ते VJNT...राज्य मागासवर्ग आयोगाची बैठकीतील 'सहा' मोठे निर्णय

Continues below advertisement

राज्य मागासवर्ग आयोगाची आज पुण्यात बैठक पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे OBC, VJNT आणि मराठा समाजासह खुल्या प्रवर्गातील सर्व समाज घटकांचे आयोगाकडून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणासाठीचे निकष एकसमान असतील असा धोरणात्मक निर्णय आयोगाने घेतलाय. याचा अर्थ असा की सर्व सामाज घटकांचे सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण मोजण्याचे निकष एकच असणार आहेत. यामध्ये सामाजिक मागासलेपणाला साधारण ५० टक्के, शैक्षणिक मागासलेपणाला ३० टक्के आणि आर्थिक मागासलेपणाला २० टक्के वेटेज असणार आहे. या निकषांच्या आधारे प्रश्नावली निश्चित होईल आणि केवळ दहाच दिवसात सर्वेक्षणाला सुरुवात होईल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram