मराठा आरक्षणासाठी राज्य आणि केंद्र सरकारने मिळून प्रयत्न करायला हवा : खासदार छत्रपती संभाजीराजे
खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेऊन मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने मिळून प्रयत्न करायला हवेत असं म्हटलं. मात्र केंद्र सरकारच्या वकिलांनी राज्य सरकारला मागासवर्ग आयोग नेमण्याचा आणि त्याआधारे आरक्षण देण्याचा अधिकारच नसल्याची भुमिका सर्वोच्च न्यायालयात मांडलीय. याबाबत विचारणा केली असता खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी केंद्र सरकारच्या वकिलांनी अशी भुमिका मांडलीच नसल्याचा दावा केलाय. मात्र जरी केंद्र सरकारच्या वकिलांनी अशी भुमिका मांडली असेल तर केंद्र सरकारने त्याबद्दलची भुमिका स्पष्ट करणारे पत्र द्यावे असं सांगायलाही खासदार छत्रपती संभाजी राजे विसरले नाहीत. अपवादात्मक परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत अशी मागणी त्यांनी केलीय. त्याचबरोबर एम पी एस सी ची परिक्षा घेण्याला आपला कधीच विरोध नव्हता असा दावाही खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी केलाय.