Special Report | पुण्यातील जीएमआरटी टेलिस्कोपनं संशोधन, 26 कोटी प्रकाशवर्ष नवी गॅलक्सी | ABP Majha
पुण्यातील नॅशनल सेंटर फाॅर रेडिओ एस्ट्रोफिजिक्सच्या शास्त्रज्ञांनी खगोलशास्त्रामधील एक महत्त्वपूर्ण शोध लावला. पृथ्वीपासून २६ कोटी प्रकाशवर्ष दूर हायड्रोजन वायूने आच्छादित एका गॅलेक्सीचा त्यांना शोध लावला. या गॅलेक्सीपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना अर्थातच मदत केली ती पुणे जिल्ह्यातील नारायण गावाजवळील जीएमआरटी या दुर्बीणीने. जगातली सगळ्यात मोठी ही मीटरवेव्ह दुर्बिण फक्त भारतातलेच नाही तर परदेशी खगोलशास्त्रज्ञांचेही डोळे बनली आहे.