मुंबईत LGBT परेडमध्ये शरजील समर्थक घोषणा? सोमय्यांकडून तक्रार दाखल
एबीपी माझा या व्हीडिओची खात्री करत नाही. भाजप नेते किरीट सोमय्यांनी मात्र यावर आक्षेप घेत पोलिसांकडे तक्रार केली आहे, तसंच याबाबत खातरजमा करण्याची विनंतीही केली आहे. आसामला भारतापासून तोडण्याची भाषा करणाऱ्या शरजीलच्या समर्थनात नारे दिल्यानं एलजीबीटीच्या परेडमधील हा व्हीडिओ चर्चेत आलाय. आधी नियोजित असल्याप्रमाणे एलजीबीटीची प्राईड परेड ऑगस्ट क्रांती मैदानात होणार होती, मात्र या परेडमध्ये सीएएचा विरोध दर्शवण्यात येईल, या शंकेनं पोलिसांनी परवानगी नाकारली होती