
Shashikant Ahankari Passed Away : समाजसेवक डॉ. शशिकांत अहंकारी यांच पुण्यात निधन : ABP Majha
हॅलो मेडिकल फाउंडेशनचे संस्थापक डॉक्टर शशिकांत अहंकारी यांचं पुण्यात निधन झालय. गेल्या काही दिवसांपासून अहंकारी कर्करोगाने त्रस्त होते. अखेर त्यांची आज सकाळी पुण्यात प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर उद्या बुधवारी उस्मानाबाद जिल्ह्यातल अणदूर येथे अंत्यसंस्कार होणार आहेत. डॉक्टर अहंकारी हे उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात असणाऱ्या खुदावाडीचे रहिवाशी होते. त्यांनी खुदावाडीजवळ असणाऱ्या अणदूर येथे १९९३ मध्ये हॅलो मेडिकल फाउंडेशनची स्थापना केली. या फाउंडेशनच्या माध्यमातून डॉक्टर अहंकारी आणि त्यांच्या पत्नी डॉ. शुभांगी अहंकारी समाजातील तळागाळातील लोकांना आरोग्यसेवा देत होते. डॉक्टर अहंकारी यांनी ४०० पेक्षा अधिक ग्राम आरोग्य कर्मचार्यांना आरोग्य सेवा देण्यासाठी प्रशिक्षित केले आहे. डॉक्टर अहंकारी यांच्या निधनाने एक समाजसेवक गमावल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केलीये...