Sharad Pawar Baramati : शरद पवार मैदानात, बारामती पिंजून काढणार, विधानसभेआधी अजित पवारांना शह?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSharad Pawar Baramati : शरद पवार मैदानात, बारामती पिंजून काढणार, विधानसभेआधी अजित पवारांना शह?
बारामती लोकसभा मतदारसंघात अजित पवारांना धूळ चारल्यानंतर शरद पवारांनी आगामी विधानसभा निवडणुकीतही त्यांना शह देण्याचं ठरवलंय. त्यासाठी शरद पवार आजपासून तीन दिवस बारामती तालुका पिंजून काढणार आहेत.
निंबुत या गावापासून दौऱ्याची सुरुवात होणार आहे.. त्यांच्या दौऱ्यात योगेंद्र पवार देखील सहभागी होणार आहेत...३५ वर्षांपूर्वी शरद पवारांनी बारामतीचा कारभार अजित पवारांकडे सोपवल्यावर कधीच असा बारामतीचा भाग पिंजून काढला नव्हता असं जाणकार सांगतात. मात्र आता शरद पवार पुन्हा मैदानात उतरलेत.. लोकसभा निवडणुकीत बारामती विधानसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळेंनी सुनेत्रा पवारांच्या विरोधात ४८ हजारांचे मताधिक्य मिळाल्यानं अजित पवारांच्या समोर विधानसभेला मोठं आव्हान असणार आहे. आता खुद्द शरद पवार बारामती तालुका पिंजून काढत असल्याने अजित पवारांच्या अडचणी वाढणा आहेत.