Sharad Mohol Murder Case Update : कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्येचं EXCLUSIVE फुटेज
Sharad Mohol Murder Case Update : कुख्यात गुंड शरद मोहोळ (Sharad Mohol) हत्येचं EXCLUSIVE सीसीटीव्ही फुटेज (CCTV Footage) एबीपी माझाच्या हाती आलं आहे. शुक्रवारी पुण्यात शरद मोहोळ याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. शरद मोहोळ हत्येची धक्कादायक घटना सीसीटीव्हीमध्ये (Sharad Mohol Case CCTV Video) चित्रित झाली असून याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. शुक्रवारी शरद मोहोळच्या लग्नाचा वाढदिवस होता. शरद मोहोळने (Sharad Mohol Case Update) त्याच्या पत्नीसोबत वाढदिवस साजरा केला. लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी त्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्येचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. यामध्ये स्पष्ट दिसत आहे की, शरद मोहोळसोबत सावलीप्रमाणे चालणाऱ्या त्याच्या साथीदारांनीच त्याच्यावर पिस्तुलातूव गोळ्या झाडल्या, ज्यामुळे त्याचा अंत झाला.