Sharad Mohol case : शरद मोहोळ हत्येच्या 15 दिवसांनी सर्वात मोठं कारण समोर : Mandar Gonjari

Continues below advertisement

Sharad Mohol case : शरद मोहोळ हत्येच्या 15 दिवसांनी सर्वात मोठं कारण समोर : Mandar Gonjari

शरद मोहोळ हत्याप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला गुंड विठ्ठल शेलार याची काही वर्षांपूर्वी भाजपाच्या युवा शाखेच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती. 
शेलार याने २०१७ मध्ये पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट आणि पुणे भाजपाचे जिल्हाध्यक्ष बाळा भेगडे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता.
 त्यानंतर बापट आणि भेगडे यांनी शेलार याची पक्षाच्या युवा अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. शेलार हा मुळचा मुळशी तालुक्यातील उरवडे गावचा रहिवासी आहे. 
त्याच्यावर खून, खूनाचा प्रयत्न, अपहरण आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. २०१४ मध्ये त्याच्यावर मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 तसेच त्याला अटकही झाली होती. २०१७ मध्ये त्याची जामीनावर सुटका करण्यात आली होती. त्यानंतर काहीच दिवसांत त्याने भाजपात प्रवेश केला.
भाजपाने विठ्ठल शेलारवर मुळशी, मावळ आणि भोर तालुक्यांची जबाबदारी सोपवली होती. दरम्यान, विठ्ठल शेलारच्या भाजपाप्रवेशानंतर पक्षावर टीका सुरू झाली. 
त्यानंतर गिरीश बापट म्हणाले होते की, आम्हाला विठ्ठल शेलारच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती नव्हती. आम्ही त्याच्यावर कारवाई करू.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram