Pune : दौंड तालुक्यात स्कूल व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, 7 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

पुण्याच्या दौंड तालुक्यात स्कूल व्हॅन आणि कारचा भीषण अपघात झालाये.. या अपघातात 7 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाला.. तर एका विद्यार्थिनीसह दोन्ही वाहनचालक जखमी झालेत. पडवी गावानजिक हा अपघात झाला असून अवनी ढसाळ असं अपघातातील मृत चिमुकलीचं नाव आहे.. बारामतीतील सुपे इथल्या विद्या प्रतिष्ठान शाळेत ही स्कूल व्हॅन जात असताना हा अपघात झाला. दरम्यान, जखमी चालक आणि विद्यार्थीनीवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत तर याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola