Satyaki Savarkar : सारवकरांबाबत झालेल्या वादावर नातू सात्यकी सावरकरांची भूमिका काय?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत वक्तव्य केल्यानंतर त्यावरून वाद सुरु झालाय. या सगळ्या वादानंतर स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नथुराम गोडसे यांचे नातू असलेले सात्यकी सावरकर यांनीही आपली भूमिका मांडलीय. तुरुंगात खितपत पडण्याऐवजी बाहेर येऊन देशाची सेवा करणं त्यांनी योग्य मानलं. कैदी म्हणून मागितलेल्या अधिकारांना माफीपत्र म्हणता येणार नाही, असं सात्यकी सावरकर यांनी म्हटलंय.