Uday Lalit :मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत कार्यक्रमात उपस्थित राहण्यात काही गैर नाही :उदय लळीत
देशाचे माजी सरन्यायाधीश उदय लळीत यांनी माझाला दिलेल्या सुपर एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत न्यायपालिका आणि त्यांच्या कारकीर्दीत झालेल्या वादांवर भाष्य केलं. एका कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या उपस्थितीवरून वाद निर्माण झाला होता. मात्र अशा उपस्थितीत काही गैर नाही असं स्पष्ट मत न्यायमूर्ती उदय लळीत यांनी माझाला दिलेल्या मुलाखतीत मांडलं. माझाचे प्रतिनिधी प्रशांत कदम यांनी घेतलेल्या सुपर एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत न्यायमूर्ती लळीत या उपस्थितीतबाबत काय म्हणाले पाहुयात.