Pune Sassoon Hospital : ससून रुग्णालयातून 12 कैद्यांची पुन्हा येरवडा जेलमध्ये रवानगी
पुण्यातील ससुन रुग्णालयातून ललित पाटील हा ड्रग माफिया पळून गेल्यानंतर, ससुनच्या 16 नंबर वॉर्डमध्ये गंभीर गुन्ह्यातील आरोपी उपचारांच्या नावाखाली ठाण मांडून बसल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर ससूनच्या तीन सदस्यीय डॉक्टरांच्या टीमने या कैद्यांची वैद्यकीय तपासणी करुन त्यांना ससूनमध्ये ठेवण्याची गरज आहे का याबद्दल अहवाल सादर करण्यास सांगितलं होतं. समितीने काल संध्याकाळी अहवाल सादर केला. मात्र त्याआधीच ससूनच्या 16 नंबर वॉर्डमधून 12 कैद्यांना पुन्हा येरवडा कारागृहात हलवण्यात आल. यामधे माजी आमदार अनिल भोसले, गँगस्टर रुपेश मारणे, हेमंत पाटील यांचा समावेश आहे.