Pune Alandi : वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळा
वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. पुण्यातील देवाच्या आळंदीत 2 डिसेंबरला संत ज्ञानेश्वर महाराजांचा संजीवन समाधी सोहळा पार पडणार आहे. हा सोहळा पंढरपूरमध्ये साजरी झालेल्या कार्तिकी एकादशी प्रमाणेच होणार आहे. आळंदीत आज पार पडलेल्या बैठकीत तसा निर्णय झालाय. देवस्थान, पोलीस यंत्रणा आणि महसूल प्रशासनाचे यावर एकमत झालंय. पण याबाबतचा अंतिम निर्णय जिल्हाधिकारी राजेश देशमुख घेणार आहेत. त्यांच्यासोबत गुरुवारी दुपारी तीन वाजता बैठक होईल. तर याची घोषणा शुक्रवारच्या कोरोना आढावा बैठकीत पालकमंत्री अजित पवार करण्याची शक्यता आहे.