Pune Fire Update: पुण्यात सॅनिटायझर तयार करणाऱ्या कंपनीला भीषण आग, आगीत 15 कामगारांचा होरपळून मृत्यू
मिकी घई, एबीपी माझा, पुणे
Updated at:
07 Jun 2021 10:22 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआता आग आटोक्यात आली असून कुलिंग आणि कर्मचाऱ्यांच सर्च ऑपरेशन सुरू आहे. आग लागलेली कंपनी ही मुळशीतील उरवडे गावाच्या हद्दीत आहे. आग लागलेली कंपनीत क्लोरीन क्लोराईड बनवण्याचे काम करण्यात येत होते. क्लोरीन क्लोराईड असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले असावे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. क्लोरीन क्लोराईडचे बॉक्स असल्यानं आग धूमसत गेली आहे.