21 जूनपासून देशभरातील सर्व नागरिकांना मोफत लस, केंद्राकडून राज्यांना लशींचा पुरवठा : पंतप्रधान
Continues below advertisement
नवी दिल्ली : देशावरील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोरोना लसीकरणाबाबत मोठी घोषणा केली आहे. 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना मोफत लस दिली जाणार आहे.
देशातील सर्व नागरिकांच्या लसीकरणाची सर्व जबाबदारी केंद्र सरकार घेणार असल्याची घोषणाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. 21 जूनपासून 18 वर्षावरील सर्वांना केंद्राकडून मोफत लस दिली जाणार आहे. त्यामुळे राज्य सरकारला लसीकरणासाठी काहीही खर्च करावा लागणार नाही.
Continues below advertisement
Tags :
Corona Vaccination PM Modi Corona Vaccine Maharashtra Vaccination Vaccination COVID Vaccine Covid Vaccnation Free Vaccine Vaccination For All