Sandeep Patil on Naxal Dark Web : नक्षलवाद्यांकडून डार्क वेबचा वापर, हायटेक टूलचे पुरावे पोलिसांकडे
Sandeep Patil on Naxal Dark Web : नक्षलवाद्यांकडून डार्क वेबचा वापर, हायटेक टूलचे पुरावे पोलिसांकडे
पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांच्या नजरेपासून वाचण्यासाठी नक्षलवादी आणि त्यांचे थिंक टँक असलेले अर्बन नक्षल सध्या डार्क वेबचा वापर करत असल्याचे समोर आलंय. त्यासाठी TOR ब्राउझर आणि प्रोटॉन मेलचा वापर अर्बन नक्षल्याकडून केला जातोय. गेल्या काही दिवसांत नक्षलवाद्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी डार्क वेबचा वापर करून नक्षलवाद्यांच्या PLGA साठी शस्त्र आणि स्फोटकांच्या खरेदीसाठी वापर केल्याचे पोलीस तपासात पुढे आलंय. आणि नक्षल्यांचं हे हायटेक टूल रॅकेट उद्ध्वस्त करण्यासाठी अँटी नक्षल ऑपरेशनदेखील सज्ज झालंय.