Koregaon Bhima : शौर्य दिनानिमित्त पुण्यातील कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास अभिवादन
शौर्य दिनानिमित्त पुण्यातील कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं आंबेडकर अनुयायी दाखल झाले आहेत...२०५ वा शौर्यदिन साजरा करण्यासाठी राज्यभरातून अनुयायी पोहचलेत..205 वर्षांपुर्वी कोरेगाव भीमा इथ झालेल्या लढाईत महार आणि इतर समाजातील सैनिकांच्या पराक्रमुळे ब्रिटिशांनी पेशव्यांच्या सैन्याचा पराभव केला होता. 1 जानेवारी 1927 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या विजय स्तंभास भेट देऊन हा इतिहास पुढे आणला. तेव्हापासून या ठिकाणी शौर्य दिवस साजरा करण्यास सुरुवात झाली.