Pune : पुण्यात सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकार्‍याच्या घरात चोरी, 42 लाख 50 हजारांच्या ऐवज लंपास

लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पुण्यातल्या मुंढवा परिसरात राहणारे निवृत्त महसूल अधिकारी दत्तात्रय डोईफोडे, यांच्या घरात चोरी झाली आहे. चोरट्यांनी थोडा थोडका नव्हे, तर तब्बल 43 लाख 50 हजारांच्या ऐवजावर हात मारलाय. ज्यात 150 तोळे सोने आणि अडीच लाख रुपयांच्या रकमेचा समावेश आहे. दत्तात्रय डोईफोडो यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यांचे पुत्र सागर डोईफोडे हे आयएएस अधिकारी असून सध्या ते जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत आहेत. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी डोईफोडे यांनी आपलं घर रात्री साडे अकराच्या सुमारास बंद करुन घेतलं होतं. चोरट्यांनी खिडकीचे गज कापून बंगल्यात प्रवेश केला आणि साडे त्रेचाळीस लाखांचा मुद्देमाल चोरला. आता चोरट्यांना अटक कऱण्याचं आव्हान पुणे पोलिसांसमोर असणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola