Pune दीड वर्षानंतर कॉलेजचा पहिला दिवस कसा होता? पुण्यात आजपासून कॉलेजेस सुरू
महाविद्यालयांमधील बाकांवरची धूळ आता दूर होणार आहे. दीड वर्षांनी महाविद्यालयांमध्ये तरुण-तरुणींचा गजबजाट होणार आहे. प्रत्यक्षात कॉलेजमध्ये जाता येणार असल्यानं पुण्यातील विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये आनंदाचं, उत्साहाचं वातावरण आहे. पुणे जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयं आणि विद्यापीठं आजपासून खुली होताहेत. जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यानं आजपासून पुण्यातील महाविद्यालयं आणि विद्यापीठं सुरु होणार आहेत.
Tags :
College Reopen