आंबिवलीतील निसर्ग उद्यानाची सफर, रंगीबेरंगी फुलांचं, फुलपाखरांचं दर्शन, 50 एकर जागेत उद्यान
Continues below advertisement
कल्याणजवळच्या आंबिवलीत निसर्ग उद्यान उभारण्यात आलंय. कल्याण-डोंबिवली महापालिका, वनविभाग आणि सामाजिक संस्थांच्या प्रयत्नांमधून 50 एकर जागेत हे निसर्ग उद्यान उभं राहिलंय. एकेकाळी ओस पडलेल्या या जागेने आता जणू हिरवा शालू पांघरलाय. या उद्यानात सध्या विविध प्रकारची सुंदर फुलपाखरं नागरिकांचं लक्ष वेधून घेत आहेत.
Continues below advertisement