
Ravikant Tupkar Pune : स्वाभिमानी शेतकरी संघटनेत लवकरच फूट पडणार?, लवकरच स्वतंत्र गटाची घोषणा करणार?
Continues below advertisement
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर आज पुणे येथे होणाऱ्या शिस्तपालन व कोअर कमिटीच्या मीटिंगला जाणार नाहीयेत. अतिशय विश्वसनीय सूत्रांनी एबीपी माझाला ही माहिती दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तुपकर हे इतर कुठल्याही पक्षात प्रवेश न करता स्वाभिमानीचाच दुसरा गट स्थापन करण्याची दाट शक्यता आहे. परवापासून नॉट रिचेबल असलेले तुपकर लवकरच माध्यमांसमोर आपली भूमिका मांडणार आहेत.
Continues below advertisement