Rajya Sabha passes Delhi services Bill : राज्यसभेत दिल्ली सेवा विधेयक मंजूर : ABP Majha
Continues below advertisement
दिल्ली सेवा विधेयक सोमवारी रात्री राज्यसभेतही मंजूर झालं. विधेयकाच्या बाजूने १३१ मतं तर विरोधात १०२ मतं पडली. मतदान यंत्रात बिघाड झाल्याने, हे मतदान चिठ्ठ्यांच्या सहाय्याने घेण्यात आलंय. प्रचंड गदारोळ आणि गोंधळानंतर विधेयक अखेर मंजूर झा लं. आता हे विधेयक राष्ट्रपतींकडे स्वाक्षरीसाठी जाणार आहे. मात्र महत्त्वाचं म्हणजे मतदानावेळी क्रॉस-व्होटिंग झालं की काय, असा संशय येऊ लागला आहे. कारण विरोधक खासदारांची संख्या १०५ असताना, विधेयकाच्या विरोधात १०२ मतं पडली. सरकारच्या बाजूनं मतदान करणारे हे तीन विरोधक कोण असा प्रश्न आता विचारला जातोय.
Continues below advertisement