Raj Thackeray Pune : साहित्यिकांनी राजकारण्यांना खडेबोल सुनवावे, राजे ठाकरेंनी बोलून दाखवली अपेक्षा

Continues below advertisement

Raj Thackeray Pune : साहित्यिकांनी राजकारण्यांना खडेबोल सुनवावे, राजे ठाकरेंनी बोलून दाखवली अपेक्षा

राज ठाकरे यांच्या हस्ते दिल्ली साहित्य संमेलनाच्या लोगोचं अनावरण, साहित्यिकांनी राजकारण्यांना खडे बोल सुनवावेत, अपेक्षा व्यक्त..

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या रोखठोक शैलीसाठी प्रसिद्ध आहेत. आपल्या त्या लौकिकाला राज ठाकरे आज पुन्हा जागले. जे नेते शेलक्या भाषेत टीका करतात, अपशब्द काढतात, त्यांचे कान उपटणं हे साहित्यिकांचं काम आहे असं राज यांनी म्हटलं. यंदाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होणार आहे. या संमेलनाच्या लोगोचं अनावरण राज ठाकरेंच्या हस्ते पुण्यात पार पडलं. त्यानिमित्तानं राज यांचं भाषण पार पडलं. नेत्यांना खडे बोल सुनावल्यावर ट्रोलिंगची पर्वा करू नका, तुमच्या मतांचं स्पष्टीकरण देण्याची काहीही गरज नाही असा सल्लाही राज यांनी साहित्यिकांना दिला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram