Pune Rain Update | पुण्यात नागरिकांनी रात्र काढली जागून, घरातून पाणी काढण्याचं काम सुरु

Continues below advertisement

पुणे : पुण्यात पावसाने जोरदार हजेरी लावत अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. अनेक रस्ते, नाले पाण्याखाली गेले आहेत. संध्याकाळपासून पावसाने झोडपून काढले आहे. पुण्यातील पावसाचा जोर काही वेळात कमी होईल असा अंदाज वेधशाळेने दिला आहे. तोपर्यंत  पुणेकरांना आजची संपूर्ण रात्र जागून काढावी लागण्याची शक्यता दिसत आहे.


पुण्यात मुसळधार पाऊस आणि अनेक भागातील वीज गायब झाली आहे. पाषाण, कर्वे नगर या भागातील वीज गायब आहे तर बिबवेवाडी परिसरात अनेक सोसायट्यांमध्ये पाणी शिरले आहे. मुसळधार पावसाच्या अंदाजानुसार पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी उद्या माझे कुटुंब माझो जबाबदारी मोहिमेअंतर्गत गृह सर्वेक्षण स्थगित केले आहे. तसेच पुणे -सोलापुर हायवे पावसामुळे बंद केला आहे. उजनी धरणाचे पाणी भिगवण, डाळज, पळसदेव, इंदापूर येथे हायवेवर आल्याने पुण्यातुन सोलापुरकडे जाणारी वाहतुक लोणी काळभोर येथे थांबवली आहे. कोणीही सोलापुर दिशेने प्रवास करू नये असे आवाहन करण्यात आले आहे. उजनी धरणाचे 42 दरवाजे उघडले आहेत.


पुण्याप्रमाणेच पिंपरी चिंचवड शहरात मुसळधार पाऊस कोसळतोय. गेल्या तीन तासापासून पावसाची संततधार सुरूच. मावळ तालुक्यात ही पाऊस बरसतोय. रात्रभर पावसाने जोर सुरूच ठेवला तर पवना धरणातून कधीही पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतोय. त्यामुळं पवना नदी लगतच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


पुण्यात जोरदार पावसामुळे काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुणे शहरात गेल्या काही तासांपासून पडत असलेल्या पावसाने आता वेग घेतला असून आणखी काही तास सलग पाऊस पडण्याची शक्यता आहे. आपण सुरक्षित ठिकाणी थांबा, घराबाहेर पडू नका! तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी नागरिकांना केले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram