Pune Water Issue : पुणेकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली, खडकवासला धरण 82 टक्के भरलं

Continues below advertisement

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला, पानशेत, टेमघर आणि वरसगाव या धरण प्रकल्पात आता पिण्यासाठी वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्याची तूर्त चिंता मिटली आहे. काल सायंकाळपर्यंत १७.२१ टीएमसी एतका पाणीसाठा जमा झालाय. गेल्या काही दिवसांपासून खडकवासला साखळी प्रकल्पातील धरणात संततधार पावसाने चांगली हजेरी लावली. सध्या खडकवासला धरण हे ८२% टक्के क्षमतेने भरलंय. धरण क्षेत्रात सततच्या पडत असणाऱ्या पावसामुळे धरण पातळीमध्ये झपाट्याने वाढ होतेय.. त्यामुळे येत्या २४ ते ४८ तासांमध्ये खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram