Pune waste Issue | या कचऱ्याचं करायचं काय? 5 दिवसांपासून पुणेकरांची कचराकोंडी | ABP Majha
Continues below advertisement
महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळं पुणेकरांची पुन्हा एकदा कचराकोंडी झालीय. पुण्यातील कचरा ज्या ठिकाणी टाकला जातो त्या फुरसुंगीतल्या ग्रामस्थांनी 5 दिवसांपासून कचरा डेपो बंद केलाय. त्यामुळं पुण्यात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग जमा होऊ लागलेत. प्रकरण गळ्यापर्यंत आल्यानंतर कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पुणे महापालिकेनं माजी आमदाराच्या नातेवाईकाच्या कंपनीला कंत्राट दिलंय. भूमी ग्रीन लिमिटेड या कंपनीला 23 कोटी 45 लाख रुपयांचं कंत्राट मंजूर करण्यात आलं. 2015 मध्ये देखील याच कंपनीला कंत्राट देण्यात आलं होतं. मात्र, कंपनीकडे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य ती साधनं नसल्याचं समोर आलं होतं. त्यामुळं सामाजिक कार्यकर्त्यांनी कंत्राटदाराच्या नियुक्तीवर आक्षेप घेतलाय.
Continues below advertisement