Pune Visarjan : विसर्जन मिरवणुकीत पुण्यातील मानाच्या गणपतींचा थाट कायम राहणार
पुण्यातील पाच मानाच्या गणपतींविरोधात न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका निकाली काढण्यात आलीय.. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत पुण्यातील मानाच्या गणपतींचा थाट कायम राहणार आहे... पुण्यातील पाच मानाच्या गणपतींविरोधात बधई समाज ट्रस्टने केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने निकाली काढलीय. लक्ष्मी रोडवरून प्रथम पाच मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणूकच सुरू होण्याच्या प्रथेविरोधात आदेश देण्यास न्यायालयाने नकार दिलाय.. विसर्जन ऐन तोंडावर असताना स्वैर याचिका करणं चुकीचं असल्याचे राज्य सरकारने कोर्टात म्हटलंय..