Pune Vaccination : पुण्यात पुढील 3 दिवस लसीकरण बंद : ABP Majha
पुण्यात तीन दिवस लसीकरण बंद राहणार आहे. पुण्यातील सरकारी रुग्णालयांत गुरुवार, शनिवार आणि रविवारी लसीकरण होणार नाही. शुक्रवारी केवळ सकाळच्या सत्रात लसीकरण करण्यात येणार आहे. दिवाळीमध्ये लसीकरणाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. लशीचा पहिला डोस १८ वर्षांवरील १०० टक्के पुणेकरांनी घेतला आहे. आता नागरिकांनी दुसरा डोस घ्यावा यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे.