Pune University Employee Protest | शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं आजपासून बेमुदत विद्यापीठ बंद आंदोलन

अंतिम वर्षाच्या परिक्षा तोंडावर आल्या असताना महाराष्ट्रातील अकृषी विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी आणि राज्य अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकतेर कर्मचारी यांनी आजपासून विद्यापीठ बंद आंदोलन पुकारलं आहे. सुधारित आश्वासित प्रगती योजना पुनर्जिवीत करण्यात यावी, सातवा वेतन आयोग लागू करण्यात यावा, या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. 24 सप्टेंबरपासून विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद सुरु केलं होतं. आजपासून त्यांनी आंदोलनाची तीव्रता वाढवली आहे. 
 
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांमधल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत कालावधीसाठी विद्यापीठ बंद आंदोलन सुरु केलं आहे. विद्यापीठामधला कोणताही विभाग उघडला जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विदियापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेन बिल्डिंगच्यी आवारात बसून ठिय्या आंदोलन केलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola