जालना जिल्ह्यातील ग्रामसेवक बेमुदत संपावर, झेडपी मुख्याधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी
जालना जिल्ह्यातील ग्रामसेवक बेमुदत संपावर, झेडपी मु्ख्याधिकाऱ्यांची बदली करण्याची मागणी
जालना जिल्ह्यातील ग्रामसेवक आजपासून बेमुदत संपावर गेलेत. ग्रामसेवकावर आकस भावनेनं दप्तराची क्राॅस तपासणी करणे, शुल्लक कारणासाठी ग्रामसेवकांच्या सुनवण्या ठेवणे आणि ग्रामसेवकांच म्हणणं न ऐकून घेता एकतर्फी कारवाया करण्यामुळं जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामसेवक दडपणाखाली आलेत. त्यामुळं ग्रामसेवकांत असंतोष निर्माण झाला असून अनेक ग्रामसेवकांच्या मनात आत्महत्या सारखे विचार येत आहेत.. त्यामुळं मुख्याधिकारी निमा अरोरा यांच्या त्रासाला कंटाळून जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामसेवक बेमुदत संपावर गेले आहेत.. या संपात जिल्ह्यातील 730 ग्रामसेवकांचा समावेश आहे.. या संपामुळं जिल्ह्यातील पिक पंचनामे, पिकविमा, आपतकालीन व्यवस्था आणि नागरिकांना मिळणारे कागदपत्र यावर मोठा परिणाम होणार आहे.. त्यामुळं जोपर्यंत मुख्याधिकारी यांची बदली होत नाही तोपर्यंत संप असाच सुरु राहणार असल्याचा पवित्रा सर्व ग्रामसेवकांनी घेतलाय...