Pune : वाहनासकट दुचाकीस्वाराला टोईंग व्हॅनमध्ये भरलं! पुण्यात वाहतूक पोलिसांची कारवाई
पुण्यात वाहतूक पोलिसांनी नाना पेठ परिसरात एका दुचाकीस्वाराला गाडीसकट टेम्पोत भरले,ही घटना काल दुपारी पावणे-पाचच्या सुमारास घडली.यावरून पुणे वाहतूक पोलीस कशाप्रकारे कारवाई करत आहेत हे कळत आहेत.हे पोलीस कशी उचलेगिरी करत आहेत हा प्रश्न पुणेकरांना पडला आहे.चौका-चौकात ग्रुपने ठिय्ये मारून ये-जा करणार्या पुणेकर दुचाकी अडवून काही न काही कारणे सांगून अडविणे, त्यांच्याकडून दंड वसूल करत असतात.मात्र शहरात गुरूवारी सायंकाळी समर्थ वाहतूक पोलिस विभागाअंतर्गत असलेल्या नाना पेठ परिसरात वाहतूक पोलिसांनी गाडी सकट दुचाकीस्वाराला उचलून टेम्पोत भरले. यावेळी वाहतूक पोलिसाने दुचाकीस्वाराची गाडी नो-पार्कींगमध्ये असल्याचा दावा केला.परंतु, वाहनचालक जर चुकत असेल तर अशा चुकीच्या पध्दतीने कारवाई करण्याची चूक वाहतूक पोलिसाने करणे, तरी कुठपत योग्य आहे. अशा कारवाई वेळी जर दुचाकीस्वार गाडीवरून पडला असता आणि मार लागला असता तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न देखील यावेळी उपस्थित होतो.मात्र शहरात घडलेल्या या घटनेचा व्हीडीओ सध्या चांगलाच वायरल होत आहे