निर्बंध शिथिल न केल्याने पुण्यातील व्यापारी आक्रमक, दुपारी 4 नंतरही दुकानं सुरू ठेवत असहकार आंदोलन
Continues below advertisement
पुण्यातील निर्बंध शिथिल करण्यासाठी सलग दुसऱ्या व्यापाऱ्यांनी असहकार आंदोलन पुकारलंय. दुपारी 4 वाजेनंतर अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकानं सुरु ठेवली आहेत. या दुकानांवर महापालिका आणि पोलिसांकडून कारवाई सुरु आहे. राज्य सरकारने पुणे शहराचे निर्बंध शिथिल न केल्याने व्यापारी आक्रमक झालेले आहेत. कालही पुण्यातील व्यापाऱ्यांनी आपली दुकानं चार वाजेनंर सुरु ठेवली होती. अशा व्यापाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यानंतरही व्यापारी रात्री 7 पर्यंत दुकानं सुरु ठेवण्यावर ठाम आहेत.
Continues below advertisement