मुंबईत अत्याधुनिक ऑफिसचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन, एच पश्चिम या नव्या वॉर्डमध्ये काय सुविधा?
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्वात मोठ्या आणि अत्याधुनिक वॉर्ड ऑफिसचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण झाले आहे. खार-सांताक्रुझ पश्चिम विभागातील एच पश्चिम हे मुंबईतील पहिले ई-ऑफिसच्या धर्तीवर चालणारे अत्याधुनिक वॉर्ड ऑफिस म्हणून ओळखले गेलं आहे.