Coronavirus Effect | पुण्यात 5 कोरोनाग्रस्त; कात्रज, धायरी, नांदेड सिटीतल्या तीन शाळा बंद
पुण्यात ५ कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत. आणि नायडू रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. दरम्यान पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून आल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून पुण्यातील काही शाळांनी रविवारपर्यंत सुट्टी जाहीर केलीय. कात्रज, नांदेड सिटी आणि धायरी भागातील या शाळा आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले नसले तरी खबरदारी म्हणून शाळा प्रशासनाने हा निर्णय घेतलाय. तर, पिंपरी चिंचवडमध्ये आणखी एक कोरोना संशयित महिला आढळली आहे. 27 फेब्रुवारीला ही महिला दुबईतून भारतात परतली आहे. कालपासून या महिलेला त्रास सुरू झाल्यानं महिलेला नायडू रुग्णालयात हलविण्यात येत आहे...