Jitendra Awhad Vs Ganesh Naik | ...तर पवार साहेबांचाही बाप काढणार का? : गणेश नाईक
राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपमध्ये गेलेले गणेश नाईक यांच्यात सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरुच आहेत. जितेंद्र आव्हाडांनी गणेश नाईकांचा खंडणीखोर म्हणून उल्लेख केल्यानंतर आता टीकेची पातळी बापापर्यंत येऊन पोहोचली आहे. पक्ष बदण्याच्या भूमीकेवरुन गणेश नाईकांवर टीका करताना, मला दर दहा वर्षांनी बाप बदलण्याची सवय नाही, असं जितेंद्र आव्हाडांनी काल म्हटलं होतं. त्यावर बोलताना, पवार साहेबांनीही (शरद पवार) अनेक वेळा पक्ष बदलले, मग आता त्यांचाही बाप काढणार का? असा सवाल गणेश नाईकांनी विचारला आहे.