अवघ्या आठवीतील विद्यासागरनं दिलं ग्रहाला नाव, सतराशे प्रस्तावातून पुणेकराच्या नावाची निवड | ABP Majha
Continues below advertisement
आता पुणेकरांसाठी अभिमानास्पद बातमी...
कारण पृथ्वीपासून ३४० प्रकाशवर्ष दूर असणाऱ्या एका ग्रहाचं नामकरण पुण्यातील १३ वर्षीय विद्यार्थ्याने केलं आहे. विद्यासागर दौड असं या विद्यार्थ्यांचं नाव असून तो सिंहगड स्प्रिंग डेल पब्लिक स्कूलमध्ये अवघ्या आठवीत इयत्तेत शिकतोय.
एचडी ८६०८१ बी या ग्रहाला विद्यासागरनं संतमस हे संस्कृत नावं सुचवलेलं...या नामकरणासाठी एकूण आलेल्या १ हजार ७१७ प्रस्तावांपैकी विद्यासागरनं सुचवलेल्या नावावर इंटरनॅशनल एस्ट्रोनोमिकल युनियननं शिक्कामोर्तब केलं.
विद्यासागरला खगोलशास्त्राची विशेष आवड असून त्यात पुढे करिअर करायला आवडेल असं त्यानं सांगितलं.