Pune : क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागून चिमुरड्याचा मृत्यू ABP Majha
Continues below advertisement
Pune : क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागून चिमुरड्याचा मृत्यू ABP Majha
क्रिकेट खेळताना गुप्तांगावर बॉल लागल्याने एका चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यातील लोहगाव भागात घडलीय. शौर्य ऊर्फ शंभू खांदवे असं ११ वर्षीय मुलाचं नाव आहे. मित्रांसोबत क्रिकेट खेळत असताना अचानक समोरून येणारा चेंडू गुप्तांगावर लागला आणि तो मैदानावर कोसळला. काही वेळानंतर तो उठून उभा राहिला, मात्र वेदना असह्य झाल्यामुळे तो परत मैदानावर पडला. तो खाली पडताच त्याच्या मित्रांनी आरडाओरडा केला. तिथे असलेल्या नागरिकांनी शंभूला खाजगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर शंभूला मृत घोषित करण्यात आलं.
Continues below advertisement