Pune Sharad Mohol Case : शरद मोहोळचा उदय आणि अस्त, हत्याकांडाची A टू Z कहाणी

Continues below advertisement

Pune Sharad Mohol Case : शरद मोहोळचा उदय आणि अस्त, हत्याकांडाची A टू Z कहाणी

पुणे : पुण्यात आज (5 जानेवारी) भरदिवसा झालेल्या हत्याकांडाने खळबळ उडाली आहे. कोथरूडमध्ये अज्ञातांनी केलेल्या गोळीबारत कुख्यात गँगस्टर शरद हिरामण मोहोळ (Sharad Hiraman Mohol) याच्यावर गोळीबार केला. त्याला तातडीने कोथरूड परिसरातील सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, रुग्णालयात त्याला मृत घोषित करण्यात आले. त्यामुळे पुन्हा एकदा पुण्यात गँगवाॅरची चर्चा सुरु झाली आहे. 

हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना 

शरद मोहोळच्या हत्येनंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. शरद मोहोळवर झालेला हल्ला आर्थिक वादातून टोळी युद्धातील अंतर्गत वैमनस्यातून झाल्याचा प्राथमिक अंदाज असून तपास सुरू असल्याचे पुणे शहर पोलिस आयुक्त रतेश कुमार यांनी सांगितले. कोथरूड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी सांगितले की, मोहोळ येथे दुपारी दीडच्या सुमारास तीन ते चार जणांनी गोळीबार केला. हल्लेखोरांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. हत्येनंतर शरद मोहोळचे शेकडो समर्थक ससून रुग्णालयासमोर जमा झाले होते. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram