School Reopen | 23 नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरु होणार, शाळा-कॉलेजमध्ये तयारी कशी?

सोमवारपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरु होणार असल्यानं शाळामध्ये स्वच्छता आणि सॅनिटायझेशनचे काम सुरु झाले आहे. एका बेंचवर एकच विद्यार्थी बसण्याची अट घातल्याने निम्मे विद्यार्थी शाळामध्ये असतील तर निम्मे घरातूनच ऑनलाईन पद्धतीने शिकण्यामध्ये सहभागी होतील. त्यामुळे शाळांना वर्गामध्ये ऑनलाईन शिक्षणासाठी लागणाऱ्या सुविधाही तयार ठेवाव्या लागणार आहेत. शाळा व्यवस्थित चालाव्यात यासाठी पन्नास टक्के शिक्षकांनाच शाळांमध्ये येण्यास परवानगी देण्याऐवजी सर्वच शिक्षकांना शाळेत येऊ दिलं जावं अशी मागणी शिक्षण संस्थांकडून होत आहे. पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयात सोमवारी सुरु होणाऱ्या शाळासाठी कशी तयारी सुरु आहे याचा घेतलेला हा आढावा . 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola