Pune Sawkar Special Report: पुण्यात अवैध सावकारीचा धक्कादायक प्रकार ABP Majha

पुण्यात अवैध सावकारीचा धक्कादायक प्रकार एका भाविकानं केलेल्या चौकशीमुळे उघड झाला. सारसबागेसमोर भीक मागणाऱ्या एका ७० वर्षीय महिलेची गणपती मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकानं चौकशी केली. आणि एका सावकाराच्या पैशांच्या हव्यासापोटी त्या महिलेवर भीक मागण्याची वेळ आल्याचं उघड झालं. या महिलेनं नातीच्या उपचारासाठी दिलीप वाघमारे याच्याकडून ४० हजार रुपये घेतले होते. त्या बदल्यात तिनं दीड लाख रुपये तिनं परत केले. तरीही या अवैध सावकाराची हाव सुटेना. सफाई कर्मचारी म्हणून निवृत्त झालेल्या या महिलेला पेन्शनही आहे. पण तिचं एटीएम कार्ड दिलीप वाघमारेनं स्वतःकडे ठेवलं आणि दर महिना दहा हजार रुपये तो स्वतःच काढून घेत होता. महिलेला केवळ दीड ते दोन हजार रुपये देत होता. त्यात औषधांचा खर्चही भागत नसल्यानं तिला भीक मागावी लागली. हा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी दिलीप वाघमारेला अटक केलीय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola