Pune Crime : पुणेकरांनो सावधान... रस्त्यावरुन जाणाऱ्यांना लुटणारी टोळी सक्रीय ABP Majha
पुणेकरांनो सावधान......रस्त्याने एकटे फोनवर बोलत जात असाल तर खबरदारी बाळगा. कारण निर्मनुष्य रस्त्यावर किंवा वर्दळीच्या ठिकाणी माणसांना लुुटणारी टोळी पुण्यात सक्रिय झाली आहे. पुण्याच्या हडपसरमधील रवी पार्क सोसायटीच्या परिसरात दिवसाढवळ्या एका महिलेच्या हातातील मोबाईल आणि पर्स चोरट्यांनी पळवली. या महिलेने चोरांचा सुमारे १ किलोमीटरपर्यंत पाठलाग केला. मात्र, हे भामटे पसार झालेत. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस चोरांचा शोध घेत आहेत.