Pune Redbird Aviation : बारामती विमान अपघातप्रकरणी रेडबर्ड एव्हिएशनवर निलंबनाची कारवाई

Continues below advertisement

Pune Redbird Aviation : बारामती विमान अपघातप्रकरणी रेडबर्ड एव्हिएशनवर निलंबनाची कारवाई

वारंवार होणाऱ्या विमानाच्या विमान अपघातांची गंभीर दखल घेत रेडबर्ड एव्हिएशनवर कारवाई करण्यात आली आहे.. बारामतीत शिकाऊ पायलटला विमान प्रशिक्षण दिले जातं.. बारामती विमानतळावरील रेडबर्ड फ्लाईट ट्रेनिंग सेंटर अकॅडमी प्रशिक्षण देते. मागच्या सहा महिन्यात पाच अपघात तर पंधरा दिवसात दोन वेळा अपघात झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. परिणामी  रेड बर्ड एव्हिएशनवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. देशभरातील रेड बर्ड संस्थेचे कामकाज तात्काळ निलंबित करणार असे आदेश सिव्हिल एव्हीएशनचे डायरेक्टर फोर फ्लाईंग ट्रेनिंग कॅप्टन अनिल गिल यांनी दिले आहेत. रेड बर्ड कंपनीच्या एका विमान अपघात झाल्याची नोंद डीजीसीनी घेत डीजीसींनी ही कारवाई केली आहे. या संदर्भात रेडबर्ड कंपनीला ई-मेल पाठवून तातडीने कामकाज पुढील आदेश येईपर्यंत निलंबित करत असल्याचे म्हटले आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram