Pune Rains : काल संध्याकाळी पुण्याला झोडपणाऱ्या पावसाची रात्रीपासून विश्रांती ABP Majha

Continues below advertisement

पुणे शहरात काल संध्याकाळनंतर ढगांच्या गडगडाटासह झालेल्या मुसळधार पावसाने पुणेकरांची दाणादाण उडवली. जोरदार पावसामुळं अनेक सखल भागात पाणी साचलं होतं...धानोरी,  लोहगाव,  कळस या भागात जोरदार पाऊस झालाय..  या भागातील डोंगरावरून येणारं पाणी सखल भागात साठलं . ज्यामुळे रस्त्यांवर पाण्याचा मोठा प्रवाह वाहायला लागला. अनेक सोसायटी आणि घरांमधेही पाणी शिरलं... पुणे शहरातील येरवडा, टिंगरेनगर, धानोरी, नागपूर चाळ, मुंजोबा वस्ती, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड, कात्रज,  धनकवडी, वाकडेवाडी, ताडीवाला रोड, वाडिया कॉलेज, या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साठलं होतं..अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या घटनाही घडल्या. या पावसामुळे दोन वर्षांपूर्वी झालेल्या पावसाची पुणेकरांना आठवण झाली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram