Pune Railway Station Renaming | कोथरूडच्या बाई विरुद्ध बुधवार पेठेची मस्तानी
पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराचा वाद पोस्टर वॉरमध्ये परावर्तित झाला आहे. शिवसेना ठाकरे पक्षाने शहरात विविध ठिकाणी बॅनरबाजी केली आहे. त्यांनी 'कोथरूडच्या बाई नामांतराची कुमकुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा' असे पोस्टर लावले आहेत. खासदार मेधा कुलकर्णी यांनी पुणे रेल्वे स्टेशनला बाजीराव पेशवे यांचं नाव देण्याची मागणी केल्यानंतर ही प्रतिक्रिया आली आहे.