Weather Alert | पालघरला ऑरेंज अलर्ट, मुसळधार पावसाची शक्यता; मराठवाड्यात हलक्या ते मध्यम सरी
पालघर जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट जारी केला असून काही भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी बरसण्याची हवामान विभागाने वर्तवली आहे. गंगापूर धरणातून गोदावरीत होणारा पाण्याचा विसर्ग कमी करून एक हजार सातशे साठ क्युसेक वेगानं विसर्ग सुरू आहे. पिंपरी चिंचवड शहरासाठी पवना धरण पन्नास टक्के भरले असून पुढील काही महिन्यांची पाण्याची चिंता मिटली आहे.