Pune Pro Pakistan Slogans: पाकिस्तान जिंदाबाद घोषणा असलेल्या व्हीडिओची होणार फॉरेन्सिक तपासणी

पुण्यात पीएफआयच्या आंदोलनात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्याचा व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर या व्हीडिओची सत्यता पडताळण्यासाठी फॉरेन्सिक तपास करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे पुण्यातल्या आंदोलनात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्या नव्हत्या असा दावा काही लोकांनी केलाय. याबाबतचं सत्य फॉरेन्सिक तपासात समोर येईल. पोलिसांनी या प्रकरणात पीएफआय कार्यकर्त्यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंदवलेला नाही. राजद्रोहाच्या कलमाबाबत सर्वोच्च न्यायालयानं मे महिन्यात निकाल देताना कोणत्याही व्यक्तीविरुद्ध पूर्ण चौकशी केल्याशिवाय गुन्हा दाखल करता येणार नाही, असे आदेश दिले होते. त्यामुळे हे कलम न लावता चिथावणीखोर वक्तव्ये, कट आखणे, सरकारी कामात अडथळा आणणे अशी कलमं नोंदवली आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola