Pune Porsche crash: पुणे अपघातातील गाडीचा संपूर्ण मार्ग पोलिसांनी तपासला ABP Majha
पुणे अपघातातील गाडीचा मार्ग पोलिसांनी तपासला आहे. १९ मे रोजी गाडी घरातून बाहेर पडल्यापासूनचे संपूर्ण सीसीटीव्ही पोलिसांनी तपासले, फॉरेन्सिक पथकाकडून गाडीची तपासणी पूर्ण केली आहे.
हे देखील व्हिडिओ पाहा
Ambadas Danve Visit Dombivli Blast MIDC : डोंबिवली घटनेला सरकार जबाबदार, अंबादास दानवेंचा आरोप
डोंबिवली घटनेला सरकार जबाबदार असल्याची टीका राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. डोंबिवली एमआयडीसीच्या फेज दोनमध्ये बॉयलरचा स्फोट (Dombivli Blast) होऊन झालेल्या दुर्घटनेनंतर दुसऱ्या दिवशीही अग्निशमन दल आणि एनडीआरएफकडून (NDRF) शोधकार्य सुरु आहे. या शोधकार्यादरम्यान शुक्रवारी सकाळी उद्ध्वस्त अवशेषांमध्ये आणखी तीन मृतदेह सापडले आहेत. यापैकी एक मृतदेह केजी केमिकल्स कंपनीच्या आवारात आढळला. अग्निशमन दलाने हे मृतदेह एनडीआरएफच्या ताब्यात दिले असून ते आता रुग्णालयात पाठवले जातील. त्यामुळे आता मृतांची संख्या 11 वर पोहोचली आहे.
एमआयडीसीमधील अमुदान कंपनीत गुरुवारी दुपारी बॉयलरचा स्फोट होऊन भीषण स्फोट झाला होता. या स्फोटाचे हादरे दोन ते किलोमीटरच्या परिसरात बसले होते. त्यामुळे या परिसरातील इमारतींच्या काचा फुटल्या होत्या. बॉयलरचे तुकडे दीड किलोमीटर लांबच्या अंतरावर फेकले केले होते. हे तुकडे चारचाकी वाहनांवर पडून कोसळून त्यांचेही नुकसान झाले होते.
एमआयडीसीच्या आवारात भकास वातावरण, उद्ध्वस्त अवशेष
अग्निशमन दलाने गुरुवारी रात्रीच एमआयडीसीमधील आगीवर नियंत्रण मिळवले होते. त्यानंतर सर्च ऑपरेशन सुरु झाले होते. शुक्रवारी सकाळी एमआयडीसीतील बेपत्ता असलेल्या कामगारांचे नातेवाईक घटनास्थळी आपल्या आप्तांना शोधण्यासाठी आले. त्यावेळी एनडीआरएफची पथकडे उद्ध्वस्त अवशेषांच्या ढिगाऱ्याखाली मृतदेहाचा शोध घेत होते. अखेर काही तासांनी तीन मृतदेह हाती लागले आहेत. कालच्या स्फोटानंतर एमआयडीसी परिसरात सध्या सर्वत्र रासायनिक धूर पसरला आहे. त्यामुळे या भागात प्रचंड दुर्गंधी येत आहे. याठिकाणी रंग तयार करण्याच्या कंपन्या आहेत. येथील केमिकल्स जळाल्याने त्यांची वाफ हवेत पसरली आहे.